आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर माघार, समीरने आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे...!

 0
आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर माघार, समीरने आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे...!

आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर माघार, समीरने आपली उमेदवारी घेतली मागे...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद - जालना विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज दुपारी दिड वाजता अब्दुल समीर यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. यानंतर त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

अब्दुल सत्तार यांना अर्ज मागे घेतल्याचे कारण विचारले असता हा वाद जिल्ह्यापुरता मर्यादित होता. स्थानिक नेत्यांची जी वागणूक होती ती तक्रार मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या व भविष्यात असे होणार नाही महायुतीच्या नेत्यांनी समन्वयाने काम करावे. युतीत वाद विवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी असा शब्द दिला. माझ्यामुळे युतीच्या 17 विधानपरिषद निवडणुकीवर परिणाम होणार नाही यासाठी मुलाचचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याकडील मतदार व सर्व महायुतीचे मतदान करुन घेण्याची जवाबदारी आहे. महायुतीचाच विजय होईल असे त्यांनी स्पष्ट केल्याने भाजपाचे सुहास शिरसाट यांचा विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow