जिल्हाधिका-यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन केली विचारपूस...
जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस
छत्रपती संभाजीनगर, दि.10(डि-24 न्यूज)- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी ता. खुलताबाद या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व जनगणना कार्याची पडताळणी केली.
त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी एम, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्यग्रस्त कुटुंबाची भेट...
जिल्हाधिकारी गौडा यांनी पिंपरी या गावातील विष्णू काशिनाथ जोगदंड या दिवंगत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या कुटुंबाला विविध शासकीय योजनांचे देण्यात आलेले लाभ, त्यांची सद्यस्थिती याबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच आगामी हंगामासाठी बियाणे थैली दिली.
जनगणना पडताळणी...
याच गावात झालेल्या जनगणना कार्याची पडताळणी ही जिल्हाधिकारी गौडा यांनी केली. बाबुलाल भाऊलाल कुदळे यांच्या कुटुंबाची गणना झाल्याची खात्री त्यांनी मोबाईल अँपवर करू
न खात्री केली.
What's Your Reaction?