17 नोव्हेंबर रोजी ओबीसी समाजाचा एल्गार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे येणार...?
अस्तित्व टिकवायचे असेल तर 17 नोव्हेंबरच्या एल्गार मेळाव्यात सहभागी होऊन ओबीसी नेत्यांना ताकद द्या....
महात्मा फुले समता परिषदच्या वतीने शहरात आयोजित केलेल्या बैठकीत मान्यवरांचा सूर...
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी अबंड जिल्हा जालना येथे छगनरावजी भुजबळ, विजयजी वड्डेटीवार , पकंजाताई मुंढे, जयदत्त अण्णा क्षीरसागर, महादेवजी जानकर, गोपीचंदजी पडळकर, शब्बीर अन्सारी, प्रकाशअण्णा शेंडगे, बबनरावजी तायवाडे, या व इतर ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे.
या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात ओबीसी समाजातील सर्व स्तरातील नागरीक, उद्योजक, शिक्षक,अधिकारी - कर्मचारी, सर्व ओबीसी संघटनासर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शहरातील साखरे मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला ओबीसी समाजातील विविध समाजाचे प्रमुख म्हणुन जेष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर, बंजारा समाजाचे राजपालसिंह राठोड, तेली महासंघाचे कचरू वेळंजकर, वंजारी समाजाचे ॲड.महादेव आंधळे, नाभिक समाजाचे विष्णू वखरे, सचिन गायकवाड, प्रदेश प्रवक्ते प्रा.संतोष विरकर, गोसावी समाजाचे अशोक धनेगावकर, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, पार्वतीबाई शिरसाठ, रामभाऊ पेरकर, जयराम साळुंके, एल.एम.पवार, गुरव समाजाच्या धनश्री कुदळे-तडवळकर, अंबादास रगडे, सुरेश बनसोड, सरोज नवपुते, सुभद्रा जाधव, शालिनी बुंधे, अभिमन्यु उबाळे, संजय आढाव, विलास ढंगारे, विशाल पुंड, गणेश काळे, निशांत पवार, संदीप घोडके, चंद्रकांत पेहरकर, केतन हेकडे, योगेश हेकाडे, लक्ष्मण हेकडे, अर्जुन सोनवणे, चंदू नवपुते, अमोल भावसार, संजय फटाकडे, कैलास काथार, संतोष शिंदे, राहुल निकम, राम पेहरकर, सुमित कल्याणकर, अक्षय पेहरकर, जयवंत गायकवाड, राजेंद्र पूर्णे, सय्यद कलिम, आसाराम विरकर, केशव सुर्यवंशी, राजेंद्र दारुंटे, गोपाळ भड, साईनाथ करवंदे आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.
What's Your Reaction?