भरपावसात वक्फ कायद्याविरोधात खचाखच भरले आमखास मैदान...!

 0
भरपावसात वक्फ कायद्याविरोधात खचाखच भरले आमखास मैदान...!

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) मुस्लिम समाजाच्या पुर्वजांनी धार्मिक कार्यासाठी अल्लाहच्या नावाने दान केलेली वक्फ मालमत्ता आहे. कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. वक्फ मालमत्तेतील एक इंचही जागेला हात लावू देणार नाही असा कडक इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमखास मैदानावर वक्फ काॅनफरन्समध्ये आपल्या भाषणात दिला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने दिला आहे. तो अधिकार जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत कोणी हिरावून घेवू शकत नाही. आम्ही देश आणि संविधान वाचवण्यासाठी निघालो आहे. वक्फ संशोधन कायद्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा त्यावेळचे मुख्य न्यायाधिश संजीव खन्ना यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सरकारने बनवलेल्या कायद्याचे कायदेशीर रिव्ह्यू घेण्याचा अधिकार आहे. सिव्हिल वार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. न्यायालयाला तरी स्वतंत्र राहू द्या नाही तर हा देश बर्बाद होईल. वक्फ धार्मिक संस्था असताना सरकारचा हस्तक्षेप कशाला. या मालमत्ता तुम्हाला उद्योगपतींना द्यायची आहे का सरकारला खाण्यासाठी खूप आहे वक्फची मालमत्ता तर सोडा. काही चुका वक्फ मालमत्ते बाबत झाल्या असतील त्या सुधारावे लागतील. वक्फची मालमत्ता कोणी विकणार नाही यासाठी कडक कायदा आणा परंतु शेकडो वर्षांपासून धार्मिक स्थळे तेथे असताना त्याची कागदपत्रे या नवीन कायद्यानुसार आणायची कोठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जाचक अटी या कायद्यात आहे. हा कायदा केंद्र सरकारने रद्द करावा. न्यायालयाचा स्टे मिळाला तरीही चालणार नाही. हा कायदा आम्हाला मंजूर नाही. असे त्यांनी आपल्या भाषणात ठणकावले.

वक्फ संशोधन कायदा 2025 ला विरोध करण्यासाठी देश स्तरावर 13 जुलै पर्यंत विविध ठिकाणी काॅनफरन्सचे आयोजन करुन हा कायदा कसा संविधान विरोधी आहे याची जनजागृती जनतेमध्ये करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ ने पुढाकार घेतला आहे. यासाठी विविध धार्मिक संस्था, संघटना व पक्षांनी पाठींबा दिला आहे. ऐतेहासिक आमखास मैदानावर तहफ्फुज-ए- औकाफच्या वतीने भव्य काॅनफरन्सचे आयोजन केले होते. यावेळी मैदान खचाखच भरले होते. यामध्ये बुरखाधारी महीलांचाही लक्षणिय सहभाग होता. 

व्यासपिठावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव हजरत मौलाना उमरैन महफुज रहेमानी, मौलाना यासिन अली बदायुनी, एड शमशाद, जमात-ए-इस्लामी हिंदचे मलिक मुहतेसिम, मौलाना फक्रुद्दीन, पर्सनल ला बोर्डाचे सदस्य मौलाना मोईजोद्दीन कासमी, मौलाना इलियास फलाही, मौलाना महेफुजूर्रहमान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार डाॅ.कल्याण काळे, माजी मंत्री राजेश टोपे, फादर रानडे, काॅ.भालचंद्र कांगो, सुनील वाकेकर, गोरखनाथ वेताळ, इंजि.विश्वजित गोणारकर, अरविंद कांबळे, युसुफ शेख, डाॅ.शोएब हाश्मी, ख्वाजा शरफोद्दीन, नासेर सिद्दीकी, इलियास किरमानी, अफसरखान, तय्यब जफर, एड जकी पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुत्रसंचालन इंजि वाजेद कादरी व मुफ्ती अनिसुर्रहमान यांनी केले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ. बोर्डाचे सचिव मौलाना यासिन अली बदायुनी यांनी सांगितले या कायद्यातील त्रुटी प्रत्येक नागरीकांना समजावून सांगावे. हे आंदोलन कोणाच्या धर्माविरोधात नाही तर सत्ताधारी विरोधात आहे. भरपावसात काॅनफरन्स संपेपर्यंत हजारो लोक एक इंचभर पण तेथून हलले नाही. जोपर्यंत हा वक्फ संशोधन कायदा केंद्र सरकार मागे घेणार नाही शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरुच राहणार आहे. आतापर्यंत जनतेने साथ दिली तशीच साथ पुढील काळात देत राहावी असे आवाहन मौलाना हजरत उमरैन महेफुज रहेमानी यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow