180 कोटी किमतीच्या मालमत्तेकडे वक्फ बोर्डाचे दुर्लक्ष...!

 0
180 कोटी किमतीच्या मालमत्तेकडे वक्फ बोर्डाचे दुर्लक्ष...!

180 कोटी किमतीच्या मालमत्तेकडे वक्फ बोर्डाचे दुर्लक्ष...!

रेल्वेस्टेशन मस्जिद चे प्रकरण, सुनावणी घेण्यास सिईओंची टाळाटाळ, काझी तजीन अहमद काझी यांचा गंभीर आरोप....

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) रेल्वेस्टेशन समोरील क्रीम प्राॅपर्टी परिसरात आरटिओ ऑफीस समोर रेल्वेस्टेशन मस्जिदची सव्वातीन एकर वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. ज्याची सध्याची किंमत 180 कोटी आहे. या जमीनीची अवैधरित्या खरेदी विक्री केली जात आहे. समाजाला याचा शैक्षणिक फायद्यासाठी वक्फ बोर्ड वापर करु शकते. न्यायालात वक्फ बोर्डाच्या वतीने कोर्ट ऑफ कंन्टेम्ट दाखल केले नाही तर जे लोक अवैधरित्या जमिनीची खरेदीविक्री करत आहे त्यांच्या विरोधात तक्रार देऊन सुध्दा आज 23 मे रोजी सुनावणी असताना सिईओंना वेळ नाही म्हणून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप तक्रारदार काझी तजीन अहमद काझी यांनी माध्यमांसमोर केला आहे.

वक्फ संस्था सराय सर्वे नं.27, पदमपुरा छत्रपती संभाजिनगर (औरगाबाद) वक्फ मिळकतीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन सदरील जमिनीची खरेदी विक्री बेकायदेशिररित्या करण्यात आली आहे. तसेच सदरील संस्थेचा कलम 54 ची कार्यवाहीचा फैसला रेल्वेस्टेशन मस्जिद कमिटीच्या बाजूने लागलेला आहे. सदरील फैसल्याला मुजतबा महेमुद खान हाजी महेमुद खान, रफिक अहेमद पिता हसन खान, शफिक अहेमद हसन खान व इतर यांनी मिळून सदरील मिळकतीची बेकायदेशीररित्या खरेदी विक्री केलेली आहे. तसेच कलम 54 चा जो फैसला लागलेला होता त्याला सदरील लोकांनी ट्रीब्युनलमध्ये आव्हान दिले. तसेच वक्फ ट्रीब्युनल केस क्रं. 1/2004, 35/2003, 39/2003, 42/2003 व 43/2003 ह्या पाच केसमध्ये कमेटीला स्टेटस्को देण्यात आला की, जेव्हा सदरील कोर्टाचा फैसला लागत नाही तोपर्यंत सदरील जमिन ही कोणालाही खरेदी विक्री करता येत नाही. असा स्टेटस्को आजपर्यंत कायम आहे.

तसेच दिनांक 19/9/2024 रोजी वक्फ बोर्ड कार्यालयात गैर अर्जदार मुजतबा महेमुद खान हाजी महेमुद खान, रफिक अहेमद पिता हसन खान, शफिक अहेमद हसन खान, राशेद अली खान गुलाम हुसेन खान, जाहेद अली खान गुलाम हुसेन खान, शाहेद अली खान गुलाम हुसेन खान, साजिद अली खान हुसेन खान, हमीद खान नसिर खान पठाण, बशिर रशिद शेख या 9 लोकांविरुद्ध लेखी तक्रार काझी तजीन अहमद काझी अशफाकोद्दीन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात आज सुनावणी होती गैर अर्जदार हजर झाले नसल्याने वक्फ बोर्डात सुनावणी झाली नाही. पुढील तारीख 10 जून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा निवेदने देऊन सुध्दा संबंधितांवर कार्यवाही झाली नाही. यांनी ज्या मालमत्तांची अवैधरित्या रजिस्ट्री करुन दिली ती रद्द करण्याची मागणी तक्रारदार काझी यांनी केली आहे‌.

वरील सर्व इसमांनी वक्फ मालमत्तांचे बेकायदेशिर हस्तांतरण करुन खरेदी विक्री केलेली आहे. सदर फाईल एस.एण्ड टी विभागाला दिली आहे. वक्फची मालमत्ता वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे तरीही वक्फ बोर्डाची साथ मिळत नसल्याची खंत काझी यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलून दाखवली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow