राज्याचा दौरा करुन ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार - बाळासाहेब किसवे

राज्याचा दौरा करुन ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार - बाळासाहेब किसवे
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या छोट्या छोट्या जाती, मायक्रो ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. भटके विमुक्त जातींचा विकास करण्यासाठी तळागाळात या योजना पोहचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. जेव्हा मी ओबीसी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार घेतला 27 एप्रिल पासून राज्याचा दौरा करुन तळागाळातील ओबीसी समाजाचे प्रश्न समजून शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. कुरेशी, बागवान, तांबोळी समाजाचेही अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निश्चित सोडवले जातील असा विश्वास रविवारी छत्रपती संभाजिनगरच्या दौ-यावर आले असता ओबीसी व्हिजेएनटीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी त्यांनी सांगितले या समाजात लोककल्याणकारी योजना पोहचत आहे किंवा नाही हे बघणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा सुरु आहे. 29 मे रोजी लातूर येथे भव्य भटके विमुक्त जातीचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी विधानपरिषदेचे उप सभापती डाॅ.निलम गो-हे व शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी संघटनेचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हेत्रे, मराठवाडा महीला अध्यक्ष सौ.पुष्पाताई मुंडे यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






