सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी कटीबध्द - आमदार इद्रीस नाईकवाडी
 
                                अल्पसंख्यांक शाळांना व मदरशांना 10 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय अजितदादांचा - आ.इद्रीस नाईकवाडी
एका कार्यकर्त्यावर बैठकीत भडकल्याने खळबळ...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज), भाजपा शिवसेनेसोबत राष्ट्रवादी सत्तेत असली तरीही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचार बदलेले नाही. फुले-शाहु-आंबेडकर-मौलाना आझाद यांचे विचार पुढे नेत सरकारमध्ये आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द राहत समाजाच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण कल्याणकारी निर्णय घेतले. अल्पसंख्यांक शाळांना दरवर्षी दोन लाख रुपये पायाभुत सुविधा व मदरशांना मोजकेच अनुदान मिळायचे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम अल्पसंख्यांक समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या उद्देशाने शाळा व मदरशांना 10 लाख रुपये दरवरवर्शी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मदरशात शिकणा-या व राहणा-या विद्यार्थ्यांना गरम पाण्याने आंघोळ करता येईल यासाठी सोलार सिस्टम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक विकासासाठी व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार रुपये निधी देण्याची तरतूद केली. अल्पसंख्यांक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जावे यासाठी 30 लाख शैक्षणिक कर्ज व 10 लाख स्काॅलर्शिप देण्याचा निर्णय घेतला. मार्टीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मुस्लिम विद्यार्थ्यांना युपिएससी, एमपिएससीचे शिक्षण राहण्यासह व्यवस्था करण्यासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. लवकरच यांची अंमलबजावणी सुरु होणार आहे. अल्पसंख्यांक आयुक्तालय स्वतंत्र बणवण्याचा निर्णय घेतला. विशालगड व पुसेसावळीत जेव्हा दंगल भडकली. दंगलग्रस्तांना मदत करण्यासाठी तेथे पोहोचले व समाजकंटकांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी त्यावेळी पोलिस प्रशासनाला दिले होते. वक्फ संशोधन कायद्याच्या विषयात राष्ट्रवादीने अहवाल केंद्र सरकारला पाठवला. एकच खासदार राष्ट्रवादीचा असल्याने जेपिसि कमेटीत स्थान मिळाले नाही. शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना जेपिसित संधी मिळाली तरीही पाच बैठकांमध्ये ते गैरहजर राहीले. राष्ट्रवादीने वक्फ संशोधन कायद्यातील जाचक अटी काढण्यासाठी पत्र दिलेले आहे. अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी प्रमाणिक प्रयत्न करत आहे. अशी ग्वाही छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) च्या दौ-यावर शनिवारी आलेले राष्ट्रवादीचे आमदार तथा अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नाईकवाडी यांनी दिली. आगामी स्थानिक स्वाराज्य संस्था निवडणूकीत अल्पसंख्याक समाजाने राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. महानगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी दुपारी पैठण गेट येथील बागवान हाॅल येथे अल्पसंख्यांक कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. भाषण सुरु असताना व्यत्यय आणल्याने पदाधिकारी रफीक भाईजी यांच्यावर भडकले. यावेळी त्यांची पक्षशिस्त दिसून आली. रफीक भाईजींवर इद्रीस नाईकवाडी का भडकले यामुळे खळबळ उडाली व पक्षात उलट सुलट चर्चा सुरु झाली.
मेळाव्याचे आयोजन जेष्ठ नेते गयास बागवान व शहराध्यक्ष असद पटेल यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नबी पटेल, शहर कार्याध्यक्ष कय्यूम अहेमद, मोबीन सिद्दीकी, विनोद जाधव, शेख सलिम यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            