क्रांतीचौकात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला

क्रांतीचौकात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला, काही काळ झाला होता तनाव...
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना कोणाची व पात्र अपात्र प्रकरणावर निर्णय दिला. शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचा असा निर्णय दिला. उध्दव ठाकरे यांना धक्का देणारा निकाल दिल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते अक्रामक झाले. शिंदे गटाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करण्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत क्रांतीचौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे गटाकडून युवा सेनेचे कार्यकर्ते उध्दव ठाकरे आम्ही सदैव तुमच्यासोबत असे बॅनर झळकावत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांचे कार्यकर्ते अक्रामक होत घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत नेता आनंद दिघे यांचे फोटो हातात घेत घोषणा देत होते. ठाकरे गट युवासेनेचे हनुमान शिंदे, ॠषीकेश खैरे, धर्मराज दानवे, सागर खरगे, अजय चोपडा, सागर वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, शिल्पारानी वाडकर हे हातात भगवे झेंडे घेऊन जल्लोष करत होते. अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने तणाव निवळला.
What's Your Reaction?






