संपूर्ण स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी- उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले
संपूर्ण स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी - राजेंद्र देसले...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण...
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) संपूर्ण स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन राजेंद्र देसले उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद यांनी केले ते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद व ग्रामविकास संस्था संयुक्त विध्यमानाने हॉटेल इकोटेल जालना रोड येथे ग्रामपंचायतस्तरीय भागधारक दोन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ. रमेश पांडव, नरहरी शिवपुरे, राजू सोनवणे, वैशाली जगताप, संजय वाघ, जयप्रकाश बागडे, आशिष कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची मोठ्या प्रमाणात उभारणी करून हागणदारी मुक्त महाराष्ट्र आपण करू शकलो टप्पा दोन मध्ये घनकचरा सांडपाणी, प्लास्टिक मुक्त गाव, मैला गाळ व्यवस्थापन, बायोगॅस या प्रमुख पाच घटकावर ग्रामपंचायत स्तरीय प्रमुख पाच भागधारकांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता द्वारे समृद्ध गावाची उभारणी करून राज्यात व देशात उत्कृष्ट काम करायचे आहे ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजना मागची भूमिका व ग्रामविकास संस्थेच्या शाश्वत ग्रामविकास व समाजाभिमुख विविध प्रकल्पाची माहिती दिली. प्रशिक्षणात लोकसहभागातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता व उपाययोजना या विषयावर अनुक्रमे डॉ. रमेश पांडव, प्रा. जयप्रकाश बागडे, किशोर साळवे, यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी बालाजी बिरादार, राहुल रगडे, रवी सातदिवे यांची उपस्थिती होती. प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामविकास दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले करोडी, साजापूर, तिसगाव, गोलवाडी, व परिसरातील बारा गावचे सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, महिला बचत गट प्रतिनिधी, स्वच्छाग्रही यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रशिक्षणार्थींनीही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामाची माहिती दिली प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्चना पवार, रूपाली वराडे, संदीप शिंदे, रूपाली खरात, विद्या दौंड, निवृत्ती घोडके, प्रकाश राठोड, कृष्णा पवार यांनी अथक परिश्रम घेतले.
What's Your Reaction?