बिल्कीस बानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत...!
बिल्कीस बानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत...!
औरंगाबाद,दि.10(डि-24 न्यूज) बिल्कीस बानो प्रकरणातील तूरुंगातून 11 आरोपींना सुटका करण्यात आली होती. दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा या आरोपांना शरण येण्याचे निर्णय दिल्याने या निर्णयाचे स्वागत भडकलगेट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान हातात घेऊन निर्णयाचे स्वागत करण्यात आले. संविधानवादी मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचे दुपारी आयोजन करण्यात आले होते. संविधानामुळे न्याय मिळाला यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी संविधानवादी मोर्चाचे संयोजक सय्यद तौफिक, मुश्ताक अहमद, एड अभय टाकसाळ, आमिनभाई जामगवकर, डॉ.अरुण सिरसाट, राहुल साळवे, दिपक निकाळजे, आनंद कस्तुरे, उमाकांत खोतकर, प्रा.शिलवंत गोपनारायण, रवी लोखंडे, विजय चौधरी, अमित वाहुळ, शेख जमील, लतिफ पटेल, राजपाल दुबे, शेख साजिद, शाहिद काझी, सोनू पायगडे, शेख जफर, जयश्री शिर्के, प्रीती दुबे, मंजूश्री लोखंडे, शकुंतला सरीन, एड प्रतिभा चौतमल, सँडी गुरु, मलिक शेख, शाईन पठाण, योगिता वैष्णव, शेख अज्जू, इरफान मौलाना, फिरोज सरकार, शेरखान, शेख युसूफ यांच्यासह मोठ्या संख्येने संविधानवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?