दोन्ही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारिणी अखेर एकाच दिवशी जाहीर, भाजपाची जंबो शहर कार्यकारिणी

 0
दोन्ही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारिणी अखेर एकाच दिवशी जाहीर, भाजपाची जंबो शहर कार्यकारिणी

दोन्ही राष्ट्रीय पक्षांची शहर कार्यकारिणी एकाच दिवशी जाहीर, विलंबाने का होईना अखेर भाजपाची जंबो कार्यकारिणी जाहीर...

हर्षवर्धन कराड यांना बढती...बनले शहर सरचिटणीस 

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे भाजपा आणि काँग्रेस पक्षाची शहर जिल्हा कार्यकारिणी एकाच दिवशी जाहीर करण्याचा मुहुर्त मिळाला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान मिळावे यासाठी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांना कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब लागला. अशी चर्चा भाजपाच्या गोटात सुरू आहे. शहर कार्यकारिणीत 7 सरचिटणीस, 13 उपाध्यक्ष, 11 सचिव, 20 विशेष निमंत्रित सदस्य, शहरातील 49 सदस्य, शहर युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, कामगार मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष आज जाहीर करण्यात आले आहे. जंबो कार्यकारिणी सोशल मीडियावर पाठवण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष राजु बागडे, राजेश मेहता, मनिषा भन्साळी, जगदीश सिध्द, नितिन चित्ते, उज्वला दहिफळे, राजु पाटील, गणेश नावंदर, अशोक दामले, अमित देशपांडे, संजय चौधरी, सुनील जगताप, जयश्री किवळेकर.

सरचिटणीस

राजेंद्र साबळे, समीर राजूरकर, हर्षवर्धन कराड, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, अमृता पालोदकर, दिपक ढाकणे.

सचिव...

मुकेश जैन, मिना खरे, ताराचंद गायकवाड, अरुण पालवे, अजय शिंदे, विकास कुलकर्णी, सागर निळकंठ, जगन्नाथ को-हाळे पाटील, संध्याताई कापसे, अमोल झळके पाटील, अशोक जगधणे.

कोषाध्यक्ष प्रशांत भदाने पाटील.

युवा मोर्चा अध्यक्ष रामेश्वर पाटील भादवे, महिला मोर्चा शहराध्यक्ष मनिषा मुंडे वाघ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, कामगार मोर्चा अध्यक्ष हाफिज शेख, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सलिम शेख.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow