अनिस पटेल यांना काँग्रेसची मोठी जवाबदारी, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित

 0
अनिस पटेल यांना काँग्रेसची मोठी जवाबदारी, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित

अनिस पटेल यांना काँग्रेसची मोठी जवाबदारी, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) निष्ठावंत कार्यकर्ते गेली पंधरा वर्षांपासून काँग्रेसला मजबूत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले व आंदोलनात नेहमी पुढे राहणारे अनिस पटेल यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संघटन सरचिटणीस पदाची मोठी जवाबदारी दिली आहे.

मागिल पंधरा वर्षांपासून अनेक पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम करत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीत सर्वात पुढे होऊन कार्यक्रमाचे नियोजन करतात, प्रसिध्दी माध्यमांना महत्वाची माहिती देने, पत्रकार परिषदेचे आयोजन, विविध आंदोलने व कार्यक्रमांची रुपरेषा आखण्यात ते उच्चशिक्षित असल्याने पटाईत आहे. मराठी भाषेत कौशल्य असल्याने राज्यातील जेष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना नाना पटोले यांचे ते विश्वासू असल्याने त्यांना अगोदर किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष, त्यानंतर प्रदेश सचिव म्हणून किसान काँग्रेसने संधी दिली. शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख यांच्या खांद्याला खांदा लावून शहरात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी ते परिश्रम घेत असल्याने व संघटन कौशल्य असल्याने संघटन सरचिटणीस पदाचा इनाम आज नाना पटोले यांनी कार्यकारिणी जाहीर करुन दिला आहे. 

हि नियुक्ती मिळाल्यानंतर माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजीमंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष डॉ.कल्यान काळे, माजी आमदार सुभाष झांबड, प्रदेश सरचिटणीस डॉ. जफर अहेमद खान, शहागंज ब्लॉक अध्यक्ष इब्राहिम पटेल, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मोईन इनामदार, शेख कैसरबाबा, असमतखान, डॉ.अरुण सिरसाट, सलिम खान, सय्यद फयाजोद्दीन, रवी लोखंडे व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow