भुमरेंचे भागिदार मुस्लिम.. आता हे भाजपाला चालते का..? शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

भुमरेंचे भागिदार मुस्लिम आता हे भाजपाला चालते का...? - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज),
जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरेंनी दारुचे उद्योग सुरु केले. शिवसेना(उबाठा)च्या राजकारणावर मुस्लिमांशी संबंध ठेवल्याचे नेहमी टिका करते. मात्र आता भुमरे मुस्लिम लोकांना व्यवसायात भागिदार करतात ते भाजपाला व संघाला चालते का...? असा सवाल निष्ठावंत शिवसैनिकांच्या सत्कार सोहळा शिवसेना भवन येथे आयोजित केला होता या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत केला आहे.
याप्रसंगी महानगरप्रमुख राजु वैद्य व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांनी पुढे सांगितले शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची चौकशी होणार आहे. भुमरेंची वरच्या पातळीवर चौकशी सुरु आहे. संजय सिरसाठ यांचीही चौकशी सुरु आहे. आम्हाला नाव ठेवता हे कसे चालेल. आम्हा शांत बसलो तरी लोक शांत बसणार नाही, दुसरा कोणी उठेल. सगळ्यांच्या चौकशा लागणार. ज्यांनी लफडी, गडबडी केली त्यांच्या प्रोजेक्ट फडणवीस यांच्याकडून रद्द होत आहे. एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचे प्रोजेक्ट रद्द केले. फडणवीसांनी अनेकांच्या चौकश्या लावले असल्याचा दावा खैरेंनी केला आहे. या आरोपांवर आमदार विलास भुमरेंनी प्रतिक्रीया देताना सांगितले खैरेंचे आरोप राजकीय स्टंटबाजी आहे. आमचा याच्याशी काही संबंध नाही. आमचे प्रतिज्ञापत्रात संपत्तीची पूर्ण माहिती दिली आहे.
What's Your Reaction?






