विधानसभा निवडणुक पूर्वपीठिका 2024 चे प्रकाशन
विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका २०२४ चे प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज):- विधानसभा निवडणूक २०२४ साठी जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत तयार करण्यात आलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या पूर्वपीठिका चे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशन करण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवडणूक निरीक्षक बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य), श्रीमती कोर्रा लक्ष्मी (१०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर) तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके , उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल थोरात, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?