हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे, समितीच्या स्थापनेची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

हिंदी भाषा सक्तीवरील दोन्ही शासन निर्णय मागे घेत नवीन समितीची स्थापनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...
पत्रकार परिषदेत दिली माहिती
मुंबई, दि.29(डि-24 न्यूज) सध्या राज्यात हिंदी भाषेच्या शक्ती वरुन राजकारण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मुंबईत मोर्चा काढणार आहेत तर उबाठाही अक्रामक भुमिका घेत आहे. हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकित हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला. बैठकिनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या संदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार असून या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले..? बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, "त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ? ती कशा प्रकारे करावी ? मुलांना कोणता पर्याय द्यावा..? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समिती स्थापना करणार आहे. नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते, ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. आपण त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात ही स्थापना केली जाईल. यात आणखी काही सदस्य असतील. त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील"
समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्राचा निर्णय होणार तसेच, या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू केले जाईल. म्हणूनच 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला," असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
What's Your Reaction?






