इम्तियाज जलील व अफसरखान एकाच व्यासपीठावर

 0
इम्तियाज जलील व अफसरखान एकाच व्यासपीठावर

इम्तियाज जलील- अफसरखान साथ साथ...!

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) खासदार इम्तियाज जलील व माजी विरोधीपक्षनेते अफसरखान हे आज एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे एका साप्ताहिकाचे वर्धापनदिन दिनानिमित्त मलिक अंबर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते सोबत आले होते. अफसरखान हे लोकसभा निवडणुकीत इच्छुक आहेत. काही महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले पण हस्तांदोलन केले नाही. यावेळी विविध पक्षांचे नेते यावेळी पुरस्कार वितरणासाठी सोबत आले होते. यावेळी एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, डॉ.मुर्तुझा शेख, कमाल फारुकी, इलियास किरमानी, ख्वाजा शरफोद्दीन, इब्राहिम पटेल, साजिद मौलाना, जी.एस.ए.पटेल, जावेद पटेल व अल्ताफ पटेल उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow