सदस्य संख्या कमी असताना विरोधकांनी अधिवेशनात ताकदीने आवाज उठवला - अंबादास दानवे

 0
सदस्य संख्या कमी असताना विरोधकांनी अधिवेशनात ताकदीने आवाज उठवला - अंबादास दानवे

सदस्य संख्या कमी असताना विरोधकांनी अधिवेशनात महाराष्ट्राचा आवाज ताकदीने उठवला

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषदेत माहिती

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.24(डि-24 न्यूज) : विरोधकांची लोकप्रतिनिधीची सदस्य संख्या कमी असतानाही आम्ही महाराष्ट्राचा आवाज नागपूर येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात ताकदीने उठवला असल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 6 दिवसाच्या छोट्या अधिवेशनात लक्षवेधी व प्रश्न उत्तरांचा कार्यकाळ नसतानाही आम्ही मोठया प्रमाणावर सभागृहात मुद्दे उपस्थित केले असल्याचे दानवे म्हणाले. 

दररोज विधिमंडळ पायऱ्यांवर राज्यातील विविध विषयांवर आंदोलन केले. मराठवाड्यासाठी 16 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने विविध विकासात्मक योजना घोषित केल्या होत्या, त्याबाबत आवाज उठवला. निवडणुकीच्या काळात भाजपाने मोठमोठाल्या घोषणा जाहिर केल्या होत्या. वॉटर ग्रीड योजना राबवून मराठवाड्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची घोषणा केली होती.माञ,पुरवण्या मागण्यात सदरील योजनेस कसलीच तरतूद केली नसल्याने, सभागृहात जोरदारपणे हा मुद्दा उपस्थित केला असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. 

जिल्ह्याचे व शहराचे संभाजीनगर नामांतरण करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, जिल्हा सहकारी दूध संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे संभाजीनगर असा नामोल्लेख होत नसल्याचे निदर्शनास आणून तातडीने हा नामोल्लेख करण्याची मागणी दानवे यांनी केली. 

कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राविषयी आवाज उठवला. शहराची नवीन जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच आदर्श आणि यशस्वीनी पतसंस्था मधील ठेवीदारांना ठेवी मिळण्यासाठी, राज्य सरकारकडे मागणी केली असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. 

राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. राज्यावर 8 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज असल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow