साईनगर परिसरात युवकाची हत्या, आरोपीला बीड येथून ठोकल्या बेड्या, काय आहे कारण जाणून घ्या...
मामेबहिणीशी बोलण्याच्या कारणावरून 19 वर्षीय तरुणाची हत्या; आरोपी बीड येथून अटक...
साईनगर परिसरातील घटना; धमकी दिल्यानंतर चाकूने हल्ला केल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15 (डि-24 न्यूज) : मामेबहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 19 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील गारखेडा परिसरातील साईनगर येथे बुधवारी (दि. 14 ऑक्टोबर) रात्री घडली. तौसिफ शमीम शेख (वय 19, रा. साईनगर, गारखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य शेळके याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पुंडलिकनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. त्याला पोलिसांनी बीड येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आधी वाद, त्यानंतर जीवे मारण्याची धमकी...
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, तौसिफ शेख हा साईनगर परिसरात आई-वडिलांसोबत राहत होता. तो सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. बुधवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख हे नूर मशिदीच्या पाठीमागे बसले होते.
त्यावेळी आदित्य शेळके तेथे आला. आदित्यची मामेबहिण तौसिफशी बोलत असल्याच्या कारणावरून त्याने तौसिफशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाद वाढू नये म्हणून मुजम्मील यांनी तौसिफला घरी जाण्यास सांगितले. मात्र, याचवेळी आदित्यने तौसिफला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
घरासमोर मोटारसायकलवर असताना हल्ला
रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मुजम्मील घरासमोर आले असता तौसिफ मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत होता. त्याचवेळी आदित्य तेथे आला आणि त्याने तौसिफवर चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात तौसिफ गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीला बीड येथून आरोपीला अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एका खाजगी रुग्णालयात मृत घोषित...
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तौसिफला नातेवाइकांनी तातडीने मोटारसायकलवरून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे साईनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
पुंडलिकनगर पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी चुलत भाऊ मुजंमील जमील शेख याने पुंडलिकनगर दाखल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी शेळके फरार झाला होता त्याला बीड येथून पथकाने अटक केली.
मामेबहिणीशी बोलण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर घडलेली हत्या या प्रकरणाचा पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करीत आहेत. तपासातून घटनेमागील कारणांसह इतर बाबी स्पष्ट
होणार आहेत.
What's Your Reaction?