तिरंगा रॅलीमुळे राजकारण तापले, रामगिरी महाराज यांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव...!

 0
तिरंगा रॅलीमुळे राजकारण तापले, रामगिरी महाराज यांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव...!

तिरंगा रॅलीमुळे राजकारण तापले, रामगिरी महाराज यांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव

विरोधी पक्षातील आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... विधानसभा निवडणुकीचा घेतला आमदारांनी धसका... देशात, राज्यात व जगात या तिरंगा रॅलीचा संदेश गेल्याचे दिसत आहे... हजारो गाड्यांचा ताफा, लाखो लोक एकच मागणिसाठी रस्त्यावर...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) काल इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात कथित वक्तव्य करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्या विरोधात 60 हून अधिक एफआयआर दाखल असताना अटक करण्यात आली नाही म्हणून मुस्लिम समाजात नाराजी आहे. नितेश राणे यांनी सुध्दा विवादास्पद वक्तव्य केले होते त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असताना कार्यवाही होत नाही. आतापर्यंत विरोधी पक्षातील आमदार गप्प होते परंतु तिरंगा रॅली नंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते मिळावी यासाठी काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कार्यवाहीसाठी दबाव वाढवला आहे. बीडचे आमदार (शरद पवार गट) संदीप क्षिरसागर यांनी पत्र लिहून बाबा रामगिरी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार, राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत असताना कारवाई होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow