भाजीवाली बाई ते शाहनूरमिया दर्गा चौक पर्यंत रस्ता मोकळा करण्याची मनपाने केली कारवाई

 0
भाजीवाली बाई ते शाहनूरमिया दर्गा चौक पर्यंत रस्ता मोकळा करण्याची मनपाने केली कारवाई

भाजीवाली बाई ते शाहानूरमियाँ दर्गा चौक पर्यंत रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 न्यूज) आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांचे आदेशान्वये भाजीवाली बाई ते शाहानुरमियाँ दर्गा चौक दरम्यान लोकांनी 24 मी. रुंद रस्त्यावर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण केल्याने रस्त्यावर सामान्य नागरिकांना येण्या-जाण्यास नेहमी त्रास सहन करावा लागत होता. त्यानुसार आज अतिरिक्त आयुक्त-2 संतोष वाहुळे यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त-1 श्रीमती सविता सोनवणे इमारत निरीक्षक श्री मजहर अली, श्री शिवम घोडके, श्री. रविंद्र देसाई, श्री. सागर श्रेष्ठ यांनी सकाळी 7 वाजेपासून कार्यवाहीस प्रारंभ केला. शाहानुरमियाँ दर्गा झोपडपट्टी येथे कार्यवाहीची सुरुवात करण्यात येवून मोठे व लहान एकूण 15 लोखंडी पत्र्याचे शेड व 7 बांधकामावर जेसीबीच्या सहाय्याने कार्यवाही करण्यात आली असता, त्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या रोषास नजुमानता कार्यवाही पूर्ण करण्यात आली. तसेच चौसर नगर चे एकूण 21 मिळकतींना महानगरपालिकेव्दारे अनाधिकृत बांधकामाची नोटीस देवून पूढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेतर्फे दमडीमहल ते चंपाचौक मार्गाने जिन्सी पर्यंत काही दिवसात कार्यवाही नियोजीत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपले अतिक्रमण / अनधिकृत बांधकामे स्वतः पाडून घ्यावे. नसता महानगरपालिकेतर्फे जेसीबीच्या सहाय्याने कार्यवाही करण्यात येईल ज्यामुळे आपले नुकसान होईल याची आपण नोंद घ्यावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow