सुगराबी देशमुख सरपंचपदी तर उपसरपंच पदी सुदाम आव्हाड यांची बिनविरोध निवड
सुगराबी देशमुख यांची सरपंच पदी बिनविरोध निवड... उपसरपंच बनले सुदाम आव्हाड...
घणसावंगी,दि.11(डि-24 न्यूज) घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक या गावातील सरपंच पदाची निवडणूक आज संपन्न झाली. सुगराबी पाशामिया देशमुख यांची गावाच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. उपसरपंच पदी सुदाम आव्हाड बनले आहे. जामसमर्थ येथील मंडळ अधिकारी एस.एस.बोटुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. श्रीमती मीरा श्रीराम बेरगळ यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक झाली. विरोधात कोणत्याही सदस्यांनी सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सदस्य मीरा बेरगळ, सुदाम आव्हाड, जनाबाई बिगरे, चंद्रभागाबाई टेहळे व गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. महिलेच्या हाती पुन्हा गावाचा कारभार आल्याने सुगराबी यांनी गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
तलाठी तुषार गायकवाड, ग्रामसेवक एस.एम.माने यांनी निवडणूक कामी सहकार्य केले. सरपंच व उपसरपंच जनविकास आघाडीचा विराजमान झाल्याने माजीमंत्री राजेश टोपे, पैनल प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य जीवन वगरे व मौलाना एजाज देशमुख यांनी विशेष अभिनंदन केले.
याप्रसंगी माजी सरपंच पाशामिया देशमुख, रामा वगरे, तुकाराम माने, माजी सरपंच बख्तियार भाई, मुख्याध्यापक विक्रम कोळेकर, फारुख देशमुख, पोलिस पटेल शेरू पटेल, मुन्शी पटेल, मिनाज देशमुख, मोईज देशमुख, मतीन पटेल, अब्दुल रहेमान, अतिक बाबूलाल पटेल, रसुल पटेल, जुम्मा पटेल, वासेब शेख, अकील बाबू शेख, रुमखा पटेल, नय्यूम पटेल यांनी
अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?