नविन विकास आराखड्यात कब्रस्तान व स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करण्याची मागणी

नविन विकास आराखड्यात कब्रस्तान व स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करण्याची मागणी
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) जटवाडा रोड येथे 30 ते 40 हजार लोकसंख्या झालेली आहे. मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान व हिंदू समाजासाठी येथे स्मशानभूमी नसल्याने त्यांना अंतिम विधी करण्यासाठी हर्सुल व ओव्हरला यावे लागते यासाठी महापालिका प्रशासनाने नविन विकास आराखड्यात जागेची तरतूद करण्याची मागणी याकूब उस्मानी चैरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी मनपा प्रशासनाला निवेदन सादर करुन केली आहे. त्या निवेदनाची एक प्रत सहायक संचालक नगर विकास अधिकारी अन्वर रजा खान यांना दिले आहे.
रहिवाशांची हि गंभीर समस्या लवकर सोडवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मोहंमद हिशाम उस्मानी, सय्यद हमीद, संजय वाघमारे, मोईन शेख हर्सुलकर, एड अनिस पटेल, आसिफ शेख, मोहसीन शेख(लकी), राजेंद्र भालकर, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






