मराठा - ओबीसी समाजाने आरक्षणासाठी आपसात न भांडता खाजगीकरण विरोधात लढावे- वडेट्टीवार
मराठा - ओबीसी समाजाने आरक्षणासाठी आपसात न भांडता खाजगीकरण विरोधात लढावे- वडेट्टीवार
भाजपा वर सत्ताधारी नेत्यांच्या कंपनींना भरतीचा ठेका दिल्याचा गंभीर आरोप... भाजपाचे आरक्षण संपवण्यासाठी षडयंत्र...
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा आरक्षण विरोधी आहे. आरक्षण संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी कंत्राटीकरण नोकरभरती सुरू केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सात कंपन्यांना कंत्राट दिले आहेत. स्वतः मलाई खायाची आणि मराठा आणि ओबीसींना झुलवत ठेवायचे. ठेकेदारी पध्दतीने इंजिनिअरला 50 हजार महिन्याच्या वेतनावर कामाला लावणार आणि सरकार कडून 1 लाख 54 हजार घेणार. शंभरहून जास्त संवर्गाची कंत्राटी भरती होणार आहे यामध्ये मोठा नफा कमावण्यासाठी कंपन्या तयार झालेले आहे मग आपसात आरक्षणासाठी कशाला भांडतात. लढायचे असेल तर कंत्राटीकरण नोकरभरती जी आर रद्द करण्यासाठी मोठे आंदोलन मराठा व ओबीसी समाजाने उभारावे असा मोलाचा सल्ला आज विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
What's Your Reaction?