सावधान कोरोना येत आहे... महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली तातडीने बैठक

 0
सावधान कोरोना येत आहे... महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली तातडीने बैठक

सावधान कोरोना येत आहे, महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली तातडीची बैठक....

केरलात आढळले कोरोनाचे रुग्ण, शहरात थंडी वाढल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले...

औरंगाबाद,दि.19(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, केरळ राज्यात कोविड-19 चा नवीन व्हेरियंट आढळून आलेला आहे. तसेच इतर राज्यातील काहि ठिकाणी रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत व अतिरिक्त आयुक्त-१ श्री. रंजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृह येथे आज दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, यांनी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडीसिनच्या पुर्वतयारी बाबत आढावा घेतला व महानगरपालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल व ईओसी पदमपुरा, सिडको एन-11, सिडको एन-8, नेहरु नगर या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन घेण्याबाबत आदेशित करण्यात आले. सदर बैठकीत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, डॉ. राठोडकर, सर्व आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी/ कर्मचारी आणि सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते.

सदर बैठकीत कोविड-19 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.

 ILI/SARI सदृश्य रुग्णांची कोविड-19 आरटीपीआर चाचणी करुन घ्यावी.

कार्यक्षेत्रात ILI/SARI, कोव्हिड -19 तसेच साथरोग बाबत सर्वेक्षण करुन घ्यावे.

कोविड-19 च्या चाचणी साठी पुरेशा प्रमाणात किट्स उपलब्ध करुन घ्यावे.

मेल्टट्रेन हॉस्पिटल, ईओसी पदमपुरा या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत कोविड-19 चाचणी सुरु ठेवावे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडीसिन उपलब्ध करुन घेणे बाबत कळविण्यात आले.

ऑक्सिजन सिलेंडर जे पण रिकामे असतील ते तात्काळ भरुन घेण्याबाबत आदेशित करण्यात आले.

तसेच सर्व RTPCR (RAT पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची Genome Sequencing साठी RTPCR टेस्ट करणे व RTPCR टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास ते सॅम्पल Genome Sequencing साठी पाठविणे गरजेचे आहे) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे Genome Sequencing करणे सॅम्पल VRDL लॅब घाटी येथे पाठविणे गरजेचे असुन) पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे Genome Sequencing बाबत कळविण्यात आले. नागरिकांनी कोविड-19 पासुन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करावे तसेच कोविड-19 ची लक्षणे असल्यास जवळच्या मनपाच्या आरोग्य केंद्रास जाऊन कोविड-19 ची तपासणी करुन घ्यावी शहराला कोविड-19 पासुन दुर ठेवण्यासाठी खालील बाबींचे पालन करावे असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

नागरीकांना आवाहन...

 गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.

खोकताना व शिकताना हातरुमाल वा कपडयाने

तोंड झाकुन घ्या.

आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवून काढा.

 खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची कोविड-19 ची लक्षणे आढळून येणा-या बाधित व्यक्तीपासून हातभराच्या अंतरावर राहा.

पौष्टिक आहार घ्या व भरपूर पाणी प्या.

 धुम्रपान टाळा.

पुरेशी झोप व विश्रांती घ्या.

कोविड-19 बाबत मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 8956306007 या मोबाईल वर संपर्क करावे.

हे करु नका

हस्तांदोलन.

सार्वजनिक ठिकाणी थूंकू नका.

आपल्याला कोविड-19 ची लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. असे महापालिकेच्या आरोग्य

विभागाने डि-24 न्यूजला कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow