अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा समावेश - मंत्री अतुल सावे

 0
अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा समावेश - मंत्री अतुल सावे

अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा समावेश- मंत्री श्री अतुल सावे

पत्रकार परिषदेत दिली माहिती

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी विधासभेत सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहीत राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी राज्याच्या अर्थ संकपलासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माहिती देत असताना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की सरकारने सर्व घटकांना सामावून घेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या माध्यमातून युवा, शेतकरी, महिला, कामगार, दुर्बल घटक, पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्त्वांच्या विविध योजना राबविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

यासोबतच पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठविणे, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणे, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांसारख्या विविध योजना सरकार आता राबविणार असून या सोबतच महिला सशक्तिकरण करण्याकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे येणाऱ्या वर्षभरात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवून स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे. त्यासोबतच आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योगांना पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा देण्यात येणार असून या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्मिती केली जाणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक वर्ष 2024 25 पासून मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा फायदा इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना होणार असून यातून शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क मध्ये शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी दिली.

यावेळी शिवाजी दांडगे, अनिल मकरीये, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, लक्ष्मण शिंदे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow