नामांतराच्या कायदेशीर लढ्यात धर्मगुरुंचा हिशाम उस्मानी यांना पाठिंबा...!
नामांतराच्या कायदेशीर लढ्यात मुस्लिम धर्मगुरुंचा हिशाम उस्मानी यांना पाठिंबा
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) ऐतिहासिक औरंगाबादच्या नामांतराचा लढा मुंबई उच्च न्यायालयात लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करणार असल्याने मुख्य याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांना शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुस्लिम धर्मगुरुंनी आशिर्वाद देत त्यांचा सत्कार केला.
शासनाने औरंगाबाद जिल्हा, शहर, तालुका व गावाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले त्याविरोधात उस्मानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हि याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे. ऐतिहासिक शहराची ओळख मिटू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. म्हणून सर्वच स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे.
यावेळी सत्कार करताना मौलाना अबरार साहाब नांदी, मौलाना सरफराज, हाफिज असरार नांदी, मौलाना इसा इशाअती, मौलाना शकील, मौलाना सुलेमान शाहीन, हाफिज साजिद, मौलाना सुलैमान मील्ली आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?