मुसळधार पावसात भिजत शिक्षकांनी काढला विराट मोर्चा...!
मुसळधार पावसात भिजत शिक्षकांनी काढला विराट मोर्चा
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) विविध मागणीसाठी आज दुपारी मुसळधार पावसात भिजत शिक्षकांनी विराट मोर्चा विभागीय कार्यालयावर काढला.
आदर्श शिक्षक समितीच्या वतीने संस्थापक दिलीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर राज्य अध्यक्ष शिवाजीराव साखरे पाटील, राज्य महासचिव अंजुम पठाण, महीला आघाडी राज्य प्रमुख दिपा देशपांडे, मराठवाडा अध्यक्ष आर.आर.जोशी, चंदू घोडके, संतोष बरबंडे, बाबूराव गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे नवीन भरती करुन भरावे, 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची जूनी पेन्शन लागू करा, 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नका अशा एकूण 23 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले. विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी निवेदन स्वीकारले. शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चात औरंगाबाद, रायगड, सोलापूर, लातूर, गडचिरोली, नाशिक, बीड, जालना, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे, बुलढाणा जिल्ह्यातील आदर्श शिक्षक समितीचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले.
नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी संघटनेचे पदाधिकाऱ्यांची भर पावसात भाषणे झाली. छत्री घेऊन शिक्षकांनी आपला पाण्यापासून बचाव केला तर काही भीजत होते.
मोर्चाला मध्यवर्ती संघटना, शिक्षक परिषद, जुनी पेन्शन संघटना, प्रहार संघटना, सहकार शिक्षक संघटना, शिक्षक संघ, कास्ट्राईब संघटना, सेवानिवृत्त संघटना सह विविध कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला होता.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी बाबूलाल राठोड, संजीव देवरे, विष्णू गाडेकर, शिवाजी एरंडे, अनिल विचवे, बबिता नर्वटे, भारती सोळुंके, सुजाता पवार, रेखा भोसले, मनोहर पठे, नितीन भागवत, सोमनाथ रासकर, अविनाश तिबोले, प्रदिप नावडे, पवन दौड, रामेश्वर सोनवणे, अशोक महालकर, अनिल सोनवणे, दिनेश संक, नजीर शेख, आबा पाटील, बाबासाहेब सांगळे, कृष्णा घुगे, शिक्षक परिषदेचे श्रीराम बोचरे, भीमराव मुंडे, अब्दुल रहीम, सचिन एखंडे, विजय धनेश्वर, गोविंद लहाने, अनिल दाणे, बागुल, वाघ, निलेश ससाणे आदींनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?