भाजपाला दिले खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्यूत्तर...!

 0
भाजपाला दिले खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्यूत्तर...!

भाजपाला दिले खासदार इम्तियाज जलील यांनी प्रत्यूत्तर...!

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) नवीन निझाम व रजाकाराची उपमा देऊन एमआयएमला उखाडून फेका असे आपल्या भाषणात काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत एमआयएमला हद्दपार करण्याचे आवाहन केले होते. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला प्रत्यूत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले या लोकसभा निवडणुकीत जनता कोणाला उखाडून फेकणार हे लवकरच कळेल. निझाम आणि रजाकार गेले त्यांच्याशी आमचा काय संबंध, सध्या देशात जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. मजलिसचे नाव या सभेत घेतल्याने एमआयएमचा किती धाक आहे दिसून आले आहे. अगोदर महायुतीचा उमेदवार आतापर्यंत ठरलेला नाही. महायुतीतील घटकपक्ष सुध्दा या जागेवर दावा करत आहे. उमेदवारी वरून अंतर्गत कलह आहे अगोदर ते दुर करा मग कोण कोणाचा पराभव करणार जनताच ठरवेल. राम मंदिर, कलम 370, कोरोना लस व विविध विषयांवर भाषण केले. आदर्श पतसंस्थेतील घोटाळयात 62 हजार गरीब लोकांचे पैसे अडकलेले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी बोलायला हवे होते. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. बेरोजगारी वाढलेली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी काय करणार या विषयावर न बोलता एमआयएम वर बोलून गेले यामुळे असे वाटत आहे. भाजपा आणि एमआयएमचा लोकसभा निवडणुकीत थेट मुकाबला आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांची सभा छोट्याशा मैदानावर घेतली याबाबत त्यांनी चिमटा काढला. घराणेशाहीवर बोलले मग व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे बसले होते त्यांच्या मागे त्यांचे सुपुत्र आमदार, राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री तर त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील खासदार, राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण ज्यांनी आदर्श घोटाळा केला त्यांना राज्यसभेत पाठवले त्यांच्या घरात घराणेशाही नाही का...? मुंडेंच्या कुटुंबात घराणेशाही नाही का...? असा प्रश्न उपस्थित केला. 400 पारचा नारा दिला जातो मग मोठमोठे होर्डिंग्ज लाऊन जाहिरात कशासाठी. देशात दोन नेते लोकशाही संपुष्टात आणत आहे मग सर्व 543 जागा घेऊन टाका शंभर दीडशे जागेसाठी सेटलमेंट कशासाठी करता. विरोधी पक्षांना नेहमीसाठी घरी बसवा दोन नेते मिळून कोणता निर्णय घ्यायचा घ्या कोणी रोखले. महाराष्ट्रातील 45 जागेवर विजय मिळवायचे टार्गेट आहे ज्या तीन जागा सोडले त्यातील माझी एक जागा आहे म्हणून मजलिसचे नाव घेतले अशी टिका भाजपावर इम्तियाज जलील यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow