पश्चिम बंगालच्या घटनेचा एबिव्हिपिने केले निषेध, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
पश्चिम बंगालच्या घटनेचा एबिव्हिपिने केले निषेध, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) गेले काही वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखळी भागातील महिलांचे लैंगिक शोषण केले जात आहे. त्यांच्या सामुहिक अस्मितेचे उल्लंघन केले जात आहे. त्यांच्या कुटुंबियांवर राज्याचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून पध्दतशीरपणे अत्याचार केले जात आहे. माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबिव्हिपि) तीव्र निषेध करत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते घरातील अल्पवयीन मुली व महिलांना जबरदस्तीने ओढतात. भीतीपोटी त्यांचे अपहरण करतात. पक्षाच्या कार्यालयात आणतात अत्याचार व अमाणूष कृत्य करतात. असे घृणास्पद प्रकार उघडकीस आले आहे. या अत्याचाराला कंटाळून अनेक कुटुंबांना संदेशखळीतून पळून जावे लागले आहे. महीला मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हजारो महिला सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. दोषींना शिक्षा व्हावी, घटनेची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी एबिव्हिपिच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संदेशखळीच्या महिलांना न्याय मिळावा, वारंवार घडणा-या घटना बंद व्हावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी अभाविपचे महानगर प्रमुख ॠषीकेश केकान, चिन्मय महाले, रितेश राठोड, पांचल काळे, शिवरीकर शेरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?