भुकंप आला तर काय खबरदारी घ्यावी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन

 0
भुकंप आला तर काय खबरदारी घ्यावी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन

भूकंपः काय खबरदारी घ्याल....?

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज) हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे भुकंपाची नोंद झाली. ह्या भुकंपाचे सौम्य धक्के नांदेड, परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जाणवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही गंगापूर, पैठण व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील काही गावांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे संबंधित तहसिलदारांनी कळविले आहे. तथापि, या सौम्य धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. असे असले तरी भुकंपाच्या वेळी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरणाने सुचना निर्गमित केल्या आहेत. 

त्या याप्रमाणे-

१. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे.

२. ज्यांनी घराच्या पत्र्याच्या छतावर आधारासाठी दगड ठेवले असतील त्यांनी ते दगड त्वरीत काढून घ्यावे.

३. भुकंपादरम्यान घरात असल्यास सुरक्षित ठिकाणी जसे टेबल, तुळई, दरवाजाची चौकट अशा ठिकाणी आसरा घ्या. 

४. लिफ्ट्चा वापर करु नका, दाराजवळ गर्दी करु नका.

५. भुकंपादरम्यान रस्त्यावर असाल तर त्वरित मोकळ्या जागी जा. उंच जुन्या सलग इमारती , भिंती व विजेच्या तारांपासून दूर रहा.

६. रेडिओ, टिव्ही वरुन मिळणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विषयक सुचनांचे पालन करा.

७. अफवांवर विश्वास ठेवू नका.

८. पाणी, वीज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास तात्काळ बंद करा.

९. शोध व बचाव पथकास सहकार्य करा.

अशा सुचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर विनोद खिरोळकर यांनी जारी केल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow