जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आरक्षणाचा तिढा सुटणार नाही - डॉ.उदित राज

जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आरक्षणाचा तिढा सुटणार नाही - डॉ.उदित राज
दलित, ओबीसी, मायनाॅरीटी, आदीवासी परिसंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात वक्तव्य...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - सध्या मराठा-ओबीसीमध्ये आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर राजकारण पेटले आहे. राज्य सरकारने निजामाचे गॅजेटमध्ये मराठा समाजाच्या नोंदी आढळल्यास कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाजाचा यास विरोध आहे. मुस्लिम व धनगर आणि वंजारा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल सर्व जाती धर्मांना समान न्याय द्यायची इच्छाशक्ती असेल तर जातीनिहाय जनगणनेशिवाय पर्याय नाही. देशात मुस्लिम व दलितांवर अन्याय वाढत आहे. मुस्लिम समाज धार्मिक उद्देशाने एकत्र येतात परंतु जेव्हा अधिकार घेण्याची वेळ येते एकजुट होत नाही. मत चोरीचा प्रश्न काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देशासमोर मांडला हि लढाई देशाच्या प्रत्येक नागरिकाला लढावी लागेल एकट्या काँग्रेसची हि जवाबदारी नाही. आता राजकारणाची दिशा बदलली आहे फक्त भाषण करुन चालणार नाही जनतेमध्ये जावून जनजागृती व काम करावे लागेल तेव्हाच संविधान वाचेल. बोलून चालणार नाही तर कृती करावी लागेल रस्त्यावर उतरावे लागेल तेव्हाच समाजात द्वेष निर्माण करणा-यांचा मुकाबला करता येईल असे प्रतिपादन आज दलित ओबीसी मायनाॅरीटी आदीवासी परिसंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात डोमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.उदित राज यांनी केले आहे.
सिडको येथील गुलाब विश्व हाॅल येथे अधिवेशनाचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत डोमाचे जिल्हाध्यक्ष बादशहा पटेल यांनी केले. व्यासपीठावर जेष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, डोमाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण आठवले, राष्ट्रीय सचिव प्रितम कांबळे, राष्ट्रीय सचिव भाई प्रदीप अंभोरे, युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे उपस्थित होते.
अधिवेशनात जे ठराव मंजूर झाले ते केंद्र व राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. असे प्रस्तावनेत जिल्हाध्यक्ष बादशहा पटेल यांनी जाहीर केले. नोव्हेंबर महीन्यात दिल्ली येथे जंतरमंतरवर होणा-या आंदोलनात येण्याचे आवाहन यावेळी परिसंघाने केले. उपस्थितांनी डॉ.उदित राज यांचे भव्य स्वागत केले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली.
What's Your Reaction?






