अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांचे मंजूर कर्ज प्रकरणे लवकर निकाली काढा - माजीमंत्री अब्दुल सत्तार

अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांचे मंजूर कर्ज प्रकरणे निकाली काढा - माजीमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.17(डि-24 न्यूज) - मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मार्फत मंजूर करण्यात आलेल्या मुदत कर्ज योजनेच्या लाभार्थी यांना कर्जाची रक्कम वितरित करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे अल्पसंख्याक विकास मंत्री दत्ता मामा भरणे यांची भेट घेवून याबाबत पाठपुरावा केला. त्यावर मंत्री दत्ता भरणे यांनी तातडीने दखल घेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अल्पसंख्याक बोर्डाला बैठकीचे निर्देश देवून सदरील विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी मौलाना आझाद अल्सपंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष शेख जावेद उर्फ बबलू हाजी ,अल्पसंख्यांक मंत्र्यांचे खाजगी सचिव श्री दातकर, मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गफ्फार मकदुम, संचालक आलम खान, तय्यब शेख, अमिरुद्दीन काजी, शेख वसीम आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






