काही सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर जवळपास 500 कोटींची मालमत्ता - इम्तियाज जलिल

 0
काही सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर जवळपास 500 कोटींची मालमत्ता - इम्तियाज जलिल

काही सेकंदात भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर जवळपास 500 कोटींची मालमत्ता - इम्तियाज जलिल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) -

अगोदरच भुमरेंचे ड्रायव्हर चौकशीच्या घे-यात असताना आयकर विभागाची नोटीस मिळाली आणि आज एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी सालारजंग मालमत्ता बाबत नवीन खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आज 17 जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करताना सांगितले आतापर्यंत 150 कोटींचे जावेद रसुल शेख यांचे प्रकरण गाजत होते परंतु हे प्रकरण जवळपास 500 कोटींचे आहे. 500 रुपयांच्या बाण्ड पेपरवर हे व्यवहार हिबानामा करुन झाले. 2023 मध्ये अडीच एकर आणि जून 2024 मध्ये आणखी एका मालमत्तेचे असे एकूण साडेआठ एकर चे व्यवहार झाले. त्यानंतर सिटी सर्वे कार्यालयाकडून नमुना नंबर म्हणजे कुणाचे आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी सिटी सर्वे ऑफीस द्वारे नोटीस काढली जाते. 26 जून 2024 सिटी सर्वे ऑफीस सर्वेअरने 10 वाजून 54 मिनिटांनी नोटीस काढली त्यानंतर लगेच डाऊनलोडही करण्यात आली. ड्रायव्हर आणि सर्वेअर सोबत होते की काय यात शंका आहे. 25 मे 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटाला अपलोड केली काही सेकंदात अपलोड केली. तसेच रातोरात एका मंत्र्याच्या फोन नंतर पीआर कार्ड तयार झाले. सर्वे ऑफीसच्या अधिका-यांना हाताशी धरुन रातोरात कोट्यावधींची व्यवहाराची प्रक्रीया राबवण्यात आली याची चौकशी सरकारने करावी. बोगस नवाबाच्या मदतीने भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे सुमारे साडेआठ एकर जमीन हिबानामा करुन देण्यात आली. हिबानामा व पीआर कार्ड रद्द करावा व उच्चस्तरीय चौकशी सरकारने करावी अशी मागणी इम्तियाज जलिल यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी दोन्ही मालमत्तांची कागदपत्रे दाखवली. बाॅण्ड कोणी घेतले कधी घेतली यांची तारीखही त्यांनी सांगितली. एकाच दिवशी बाॅण्ड पेपर खरेदी करण्यात आले. खरेदी करणारे कोणाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow