जनविकास फाऊंडेशनच्या वतीने कॅरियर गाईडन्स कार्यशाळा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जनविकास फाउंडेशनच्या वतीने कॅरियर गाईडन्स कार्यशाळा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित...
अकोला,दि.11(डि-24 न्यूज ) रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी लोहारा, जिल्हा अकोला येथे हव्वाबाई उर्दू हायस्कूल हॉल मध्ये जनविकास फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य )च्या वतीने आठवी ते बारावीच्या मुस्लिम समाजातील उर्दू ,मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कॅरियर गाईडन्स कार्यशाळा तथा शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ह्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 09:30 ते 12:30 पर्यंत घेण्यात येणार असून या कार्यशाळेचे व शिबिराची रूपरेषा व वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहे, यात कॅरिअर गाईडन्सचा महत्व व स्कोप ,दहावी- बारावी नंतरचे विविध कोर्सेस बद्दल सविस्तर माहिती,अभ्यास तंत्र /स्टडी टेक्निक ,सोशल मीडिया -मोबाईल हे विद्यार्थ्यांसाठी शाप की वरदान, जनविकास फाउंडेशनचा उद्देश ,धोरण , अभियान- एक सामाजिक चळवळ ,पालक व पाल्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संवाद ,संपर्क व सहयोग व एकमेकांच्या प्रति असणारे कर्तव्य अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर व्याख्याने आयोजित केले आहे.
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समारंभ व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र तथा बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य आयोजक जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जमील देशमुख ,संस्थापक ट्रस्टी साबीर मिर्झा ,डॉ.अफरोज शेख ,मौलवी वसीम पटेल ,जाकीर हुसेन गु.दस्तगिर,डॉ.अमित गुंजाळ, मजीद अहमद खान, प्रमोद कांबळे ,एडवोकेट नितीन मोने, शेख जाकीर अजगर अली,शेख अझीमुद्दीन, यांनी दिली आहे, तसेच विशेष सहयोग तथा कार्यक्रमाचे समन्वयक हाफिज हन्नान
देशमुख ,शेख एजाज सर ,लोहारा.वसीम अहमद तमिझ अहमद हातरून, रिजवान शकील देशमुख लोहारा,तथा हव्वाबाई उर्दू हायस्कूल- ज्युनिअर कॉलेज मस्तानीया उर्दू हायस्कूल, शिक्षक व कर्मचारी वृंद तथा समस्त गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी आवाहन केले की या कार्यक्रमाचा व शिबिराचा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता--9422713725,-8180888683,-7773954777.
What's Your Reaction?