उद्या महाराष्ट्रातील परमिट रुम, वाईन शाॅपचा बंद...

उद्या महाराष्ट्रातील परमीटरुम, वाईन शाॅप बंद, व्हॅट दुप्पट केल्याने आर्थिक फटका...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)-
उद्या 14 जुलै रोजी राज्यातील हजारो परमिट रुम, वाईन शाॅप बंद ठेवण्याचा निर्णय होटेल अॅण्ड रेस्टाॅरन्ट असोसिएशनने घेतला असल्याची माहिती असोशिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव किशोर शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले राज्य सरकारला सर्वात जास्त उत्पन्न लिकरच्या व्यवसायातून मिळते. सरकारने दारु वरील व्हॅट 5 टक्के वरुन 10 टक्के दुप्पट करण्यात आले. परवाना शुल्कात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. देशी विदेशी दारु वर उत्पादन शुल्कात 60 टक्के वाढ करण्यात आली. यामुळे हा व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. उद्याच्या एका दिवसाच्या बंदमुळे सरकारचे एक हजार कोटी उत्पन्न बुडणार आहे. व्हॅट कमी केले नाही तर परवाने परत करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे. राज्यातील 19 हजार कायदेशीर परवानाधारक अडचणित आले आहे. यामुळे ग्राहक आणि पुर्नविक्रेते गोवा, दमन सारख्या शेजारच्या राज्यातून करचुकवेगिरी वाढेल. कर वाढल्याने 4.5 लाख थेट रोजगार व 18 लाख अप्रत्यक्ष उपजिवेकेवर संकट. जवळपास 4800 पुरक विक्रेते प्रभावित झाले. दारु वरील व्हॅट रद्द करा. 60 टक्के उत्पादन शुल्क वाढ सुसह्य स्तरावर आणा. सरकारने हा उद्योग करणा-या परवानाधारकांशी चर्चा चर्चा करुन मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जयराम साळुंके, राजेश शेट्टी, सुरेश ललवानी, अशोक जगताप, संजय मनगटे, बाळासाहेब पाटील, मंगेश निकम, महेश कोल्हे, मनोज कमलानी, राजेंद्र राठोड, विकास रायमाने, धनंजय फडके आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






