बीडकीनच्या नागरीकांचा रस्ता रुंदीकरणास विरोध, केला रस्ता रोको आंदोलन

बीडकीनच्या नागरीकांचा रस्ता रुंदीकरणास विरोध, केला रस्ता रोको आंदोलन
बीडकीन, दि.24(डि-24 न्यूज) -
छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणाच्या वतीने अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला दहा गावात सुरु करण्यासाठी संबंधित विभागाकडून मार्कींग केले जात आहे. या रस्ता रुंदीकरणास बीडकीनच्या नागरीकांनी विरोध केला आहे. ग्रामस्थांनी आज एक तास रास्ता रोको आंदोलन करुन विरोध केला. शिवसेना उबाठाचे तालूकाप्रमुख मनोज पेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याचे काम सुरु आहे. याआधी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी 50 फुट अंतरावर मार्किंग करुन अतिक्रमण काढले. त्यानंतर व्यापारी वर्ग स्थिर झाला. आता महानगर निगमने पुन्हा रुंदीकरणाचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी विरोध केला. शिवसेना उप जिल्हाप्रमुख विकास गोरडे, भारत हाडे, निलेश गुजर, प्रेम शिंदे, पंढरीनाथ मोगल, सय्यद फेरोज, राजु वैद्य, दिपक डांगरे, मोहन डांगरे, शेख रसूल आदी उपस्थित होते.
पेरे यांनी यावेळी सांगितले बिडकीनच्या मध्यभागातून शंभर फुट रस्ता जातो. त्याचे रुंदीकरण झाल्यास ग्राम सचिवालय, मंदीर, मस्जिद यांसारख्या ओळख निर्माण करणा-या वास्तू नष्ट होतील. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला जोडणारा स्वतंत्र रस्ता आणि बिडकीनसाठी बायपास हवा. माजी सरपंच हारुण जिलानी यांनी सांगितले बिडकीन ते कवडगावदरम्यान अनेक समाजांच्या स्मशानभुमी आहेत. रस्ता त्या भागातून गेला तर अंत्यसंस्कारासाठी जागा उरणार नसल्याचे सांगून त्यांनीही बायपासची मागणी केली.
What's Your Reaction?






