पँथर पुन्हा डरकाळी फोडणार, 3 नोव्हेंबरला बैठक घेण्याची रामदास आठवले यांनी केली घोषणा

 0
पँथर पुन्हा डरकाळी फोडणार, 3 नोव्हेंबरला बैठक घेण्याची रामदास आठवले यांनी केली घोषणा

पँथर पुन्हा डरकाळी फोडणार, 3 नोव्हेंबर रोजी बैठकीची रामदास आठवले यांची घोषणा...!

3 नोव्हेंबर रोजी लोनावळा येथे बैठक आयोजित केली आहे जे सोबत येतील किंवा नाही असा टोला बाळासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता आठवलेंनी लगावला...

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी, पीडितांना न्याय मिळवून देणारी दलित पँथर या लढाऊ संघटना पुन्हा सुरु करण्याबाबत 3 नोव्हेंबर 2023 रोजी लोनावळा येथे साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आमखास मैदानावर आयोजित पँथरचे सन्मान कार्यक्रमात केली आहे. 

दलित पँथर संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने शनिवारी येथील आमखास मैदान येथे पँथर कार्यकर्त्यांचा सत्कार व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबुराव कदम उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, साहित्यिक प्रा. ऋषिकेष कांबळे, शरणकुमार लिंबाळे, दिलीप जगताप, मिलिंद शेळके, प्पपु कागदे, किशोर थोरात, संयोजक संजय ठोकळ, नागराज गायकवाड आदी उपस्थित होते. 

प्रारंभी दलित पँथर चळवळीतील पँथर कार्यकर्त्यांना आठवले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना आठवले यांनी दलित पँथर संघटनेच्या कार्याबाबत माहिती दिली. अनेकदा वेळे प्रमाणे राजकीय भुमिका घ्याव्या लागतात. घेतलेली राजकीय भूमिका सर्वांनाच आवडलेच असे नाही. ज्यांना पटत असेल त्यांनी सोबत यावे, साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच काम करतो, असे त्यांनी सांगत आजघडीला देशातील विविध राज्यात रिपाई विस्तारात आहे. नागालँड मध्ये दोन आमदार पक्षाचे आहेत, असे त्यांनी सांगत मी घेतलेल्या भुमिकेमागे जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे ही नमूद केले. 

शिवशक्ती भीम शक्ती युतीचा निर्णय घेताना अनेक साहित्यिकांची चर्चा, सल्ला करुनच निर्णय घेतला होतो. एनडीएसोबत आहे याचा अर्थ बाबासाहेबांचे विचार सोडले असे नाही, शेवटपर्यंत आंबेडकरवादीच राहिल, असे त्यांनी नमूद केले. पँथर संघटना पुन्हा पुनर्जीवित करणे शक्य आहे का ? याबाबत विचारमंथन करण्यासाठी लोणावळा येथे तीन नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक साहित्यिक, विचारवंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे, चर्चेनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

तर अध्यक्षीय भाषणात कदम यांनी युवावर्गाने पँथरच्या मागे उभे राहावे, असे आवाहन केले. तर साहित्यिक कांबळे यांनी त्याग व समर्पणा शिवाय चळवळ उभीच राहू शकत नाही, असे सांगत विविध सामाजिक प्रश्न पाहता पँथरची पुन्हा बांधणी आवश्यक असल्याचे नमूद केले. जेष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, ऐक्यवादीचे अध्यक्ष दिलीप जगताप, मिलिंद शेळके, दिनकर ओंकार यासह अन्य वक्त्यांची यावेळी भाषण झालेत. प्रस्तावना आरपिआयचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संजय ठोकळ यांनी केली तर सुत्रसंचलन संयोजक तथा शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केले.

व्यासपीठावर राजाभाऊ सरोदे, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जेष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा साहित्यिक ऋषिकेश कांबळे, दौलत खरात, विजय मगरे, सिध्दार्थ दाभाडे, दिवाकर शेजवळ, ब्रम्हानंद चव्हाण आदी उपस्थित होते.

कोणाचा झाला सन्मान...

पँथर नेते गंगाधर गाडे हे आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मान स्विकारला. माजीमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांना मरणोत्तर सन्मान करण्यात आला. टि.एम.कांबळे यांनाही मरणोत्तर सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी स्विकारला.

बाबुराव कदम, दिनकर ओंकार, मिलिंद शेळके, दौलत खरात, प्रकाश निकाळजे, उत्तम शिंदे, प्रियानंद शिंदे(मरणोत्तर), रमेश खंडागळे, प्रा.दादाराव काळे, सिताराम गारदे, मधुकर चांदणे(मरणोत्तर), प्रकाश जावळे(मरणोत्तर), लक्ष्मण मगरे, मुरलीधर वडमारे(मरणोत्तर), धम्मानंद मुंडे(मरणोत्तर), ब्रम्हा कोंडिबा आढाव, अॅड ब्रम्हानंद चव्हाण, यशपाल सरवदे(मरणोत्तर), मच्छिंद्र गायकवाड (मरणोत्तर), बाळासाहेब कदम, आनंद पंडागळे, भाऊसाहेब वाघंबर(मरणोत्तर), अनंत लांडगे, रामराव गवळी, रफीक अहमद (मरणोत्तर), एस.एस.प्रधान(मरणोत्तर), बालाजी धरसरे, चंद्रकांत ठाणेसर, नारायण गायकवाड, विजय सोनवणे, लक्ष्मण बनसोडे, माधव हातागळे, राणूबाई वायवळ या पँथरचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ऐतिहासिक आमखास मैदानावर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात समर्थकांसोबत काही नेत्यांनी इंट्री केली. फटाक्यांची आतषबाजी करत रामदास आठवले यांचे मोठे हार व पँथरचा टायगर देऊन भव्य स्वागत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow