विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी चालवली तलवार...!

शिवजन्मोत्सवानिमित्त क्रांती चौकात मराठेकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके...
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) जय भवानी, जय शिवाजी... हर हर महादेव.. जय श्रीरामच्या जयघोषात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात 17 फेब्रुवारी रोजी मराठेकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सदरील सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुख्य संयोजकतेखाली हा सोहळा पार पडला.
तोफेच्या द्वारे गोळाबार उडवून आणि नारळ फोडून या मराठेकालीन साहसी खेळास सुरुवात करण्यात आली. नालासोपारा येथील वीर शिवबा नावाने प्रचलित मराठा सैनिकी आखाडा आणि शिवकालीन शस्त्राचे प्रशिक्षण संस्थेने ही प्रात्यक्षिके सादर केली. शिवकालीन मर्दानी खेळे असे या सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची नावे होत. यामध्ये ढाल तलवार, लाठीकाठी, दानपट्टा, विटा, खंजीर, कुऱ्हाड, बरची व भाला या साहसी खेळांचा समावेश होता. प्रात्यक्षिके दाखवणारी सर्व मुले आणि मुली 8 वर्षावरील होती. एकूण 8 मुले व 9 मुली असा हा संघ असल्याची, माहिती सुहास सातापे यांनी दिली. पारंपारिक आणि कोकणी संस्कृतीशी संबंधित ताशा, ढोल ताशा व टिमकी या वादकाच्या तालावर या प्रात्यक्षिकांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला.
वंश हजारे, नेदांत पालशेतकर, शैकल्प पालशेतकर, यश पालशेतकर, तन्मय गायकर, विनीत टेमकर, सोहम गावडे, राज वाधे, सुहास सातोपे, विजय गोठनकर (वाजंत्री ) ईश्वरी रामाणे, सिद्धी जाधव, प्राची जाधव, रितीका जाधव, भैरवी जाधव, त्रिशा गोरीवले, निष्का शाळती, सचिदा पालशेतकर व दिपश्री देसाई या मुले - मुलींनी ह्या साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवली.
अंगावर शाहारे आणणारी ही प्रात्यक्षिके या मुलांनी सादर केली. दानपट्ट्याद्वारे पायाखालील लिंबू कापणे, दोन्ही बाजूने आगीचे गोळे लावून काठीही फिरवणे, अशी जोखमी साहसी खेळांचे प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. शिवप्रेमींचा डोळ्यांचा पान फेडणारा हा सोहळा ठरला. मोठ्या संख्येने शिवप्रेमी व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हा साहसी खेळ बघण्यासाठी आले होते. गुरुवर्य मधुसूदन पाटील उर्फ बाळू तात्या यांचे शिष्य संस्थापक प्रशिक्षक संकेत सातोपे यांची ही संस्था होत.
मराठेकालीन आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील साहसी खेळांचा हा ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी काही परदेशी पाहुणेही आले होते. यामध्ये ब्राझील येथील अंडरसन मोरास्की, अमेरिका येथील लुसी व्हिटेकर, रायन सिम्पसन व इंग्लड येथील जॅक कॉर्नवाल यांचा समावेश होता.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चालवली तलवार...
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून या मुलांची प्रात्यक्षिके बघत असताना साहसी खेळाचा मोह आवरला नाही. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख जयसिंग होलिये यांच्यासह अंबादास दानवे यांनी तलवारबाजी खेळली. अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विजय वाघमारे, संतोष खेंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहर प्रमुख जयसिंग होलीये, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, संजय हरणे, नंदू लबडे, राणजीत दाभाडे,युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, विधानसभा संघटक रेणुका जोशी यावेळी
उपस्थित होते.
What's Your Reaction?






