इम्तियाज जलिल यांनी दंड थोपटले, नाराज नेते व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार ते माझे आपले...
इम्तियाज जलिल यांनी दंड थोपटले, नाराज असलेल्या नेत्यांची नाराजी दूर करणार...!
51 उमेदवार रिंगणात, मन्नत बंगल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष, विजयाचा संकल्प, दंड थोपटून विरोधकांना दिले आव्हान...ओसामा अब्दुल कंदीर मन्नतवर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) ज्या इच्छूकांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची माफी मागतो. एका एका प्रभागातून 50 जण इच्छुक होते. निर्णय करणे अवघड होते. मोठे आवाहन होते. माझा विरोध करणारे माझेच आहेत. त्यांची नाराजी दूर करणार आहे. युवा व चांगले उमेदवार दिले आहे. 16 जानेवारीला जेव्हा दिसेल निकाल आल्यानंतर शहराचा रंग लोक बघतील. आम्हाला विश्वास आहे मतदार दिलेल्या उमेदवारांना मते देवून विजयी करतील. नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत असतील तर त्यांचा इत्तेहादवर विश्वास नाही. त्यांनाही पक्षाने पदे आणि नगरसेवक बनण्याची संधी दिली होती आज युवा राजकारणाची दिशा बदलण्यासाठी पुढे येत आहे त्यांना संधी द्यावी असे मला वाटले. सन 2015 च्या अगोदर एमआयएमचा झेंडा खांद्यावर घ्यायला कोणी तयार नव्हते त्यानंतर 25 नगरसेवक, एक खासदार व आमदार शहरातील जनतेने दिले. आज परिस्थिती अशी झाली एका प्रभागातून 50 इच्छुक असल्याने कठोर निर्णय घेतला ते कबूल करावे असे आवाहन एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी नाराज नेते व कार्यकर्त्यांना केले आहे. ओसामाला उमेदवारी दिली तो युवा आहे तर हाजी शेरखान सारखे जेष्ठ उमेदवार पण पक्षाने दिले आहे
.
What's Your Reaction?