संवाद, समन्वय आणि सहकार्य आवश्यक - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
संवाद, समन्वय आणि सहकार्य आवश्यक - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकसभा निवडणूक २०२४

संवाद,समन्वय आणि सहकार्य आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 औरंगाबाद दि.13(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये संवाद, समन्वय आणि सहकार्य असणे आवश्यक आहे. या त्रिसूत्रीवर सगळ्यांनी काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गंगापूर आणि वैजापूर येथील आढावा बैठकीत दिले. गंगापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आणि वैजापूर येथे विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज गंगापूर व वैजापूर येथील येथे आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी विधानसभा क्षेत्र निहाय निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

बैठकीस उपिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे उपविभागीय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, तहसीलदार सतीश सोनी, मुख्याधिकारी दराडे पोलीस उपविभागीय अधिकारी भागवत यांच्यासह सर्व निवडणूक विषयक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणुकीच्या कामकाजात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे सर्व कामकाज करावे. काम करत असताना प्रत्येक नोडल अधिकारी ते मतदान केंद्र अधिकारी-कर्मचारी यांनी एकमेकांशी समन्वय सहकार्य आणि संवाद ठेवावा,असे निर्देश त्यांनी दिले.

स्वीप अंतर्गत मतदार जाणिव जागृती वाढवावी. मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी स्वीप कक्षप्रमुखाने आपल्या मतदारसंघामध्ये प्रभावी उपक्रम घेऊन लोकांना सहभाग वाढवावा. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी वेगवेगळे उपक्रम ,शाळा महाविद्यालय आणि विविध समाज घटकातील व्यक्तींच्या माध्यमातून आयोजित करण्यात यावे. यात विविध सामजिक संघटना, असोसिएशन यांनाही सहभागी करून घ्यावे असे निर्देश यावेळी देण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच मतदान केंद्रांवर सुविधा, सहायता केंद्र उपलब्ध करुन द्यावे. मतदारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा प्रशाला गंगापूर येथील शाळेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी स्वामी यांनी विद्यार्थ्यानी आपल्या पालकाला, शेजारी, नातेवाईक यांना पत्र लिहून मतदान करण्याविषयी आवाहन करावे. लोकशाहीचा अर्थ आणि यातील मतदानाचा हक्क विषयी महत्व सांगणाऱ्या संदेश पत्राच्या माध्यमातुन देण्यात आला. प्रतिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थी आणि पालकांना पत्र सुपूर्द करण्यात आले.

टंचाई उपाययोजनांसाठी सज्जता ठेवावी-जिल्हाधिकारी

    

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी टंचाई स्थितीचाही आढावा घेतला. त्यांनी सांगितले की,टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजनांची सज्जता ठेवावी. चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी नागरिकांना सोयीस्कर अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पाण्याचे स्रोत विहीर,बोअरवेल आणि तलावातील पाण्याच्या अधिग्रहणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले. वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी आणि सर्व निवडणुकीत सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले.वैजापूर उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, पोलिस उपविभागीय अधिकारी महेक स्वामी, तहसीलदार सुनील सावंत, नगरपालिका मुख्याधिकारी श्री बिघोत उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow