व्हाईस ऑफ मिडियाच्या मागणीला यश, पत्रकारांना मिळणार सवलतीच्या दरात उपचार
व्हाईस ऑफ मिडियाच्या मागणीला यश, पत्रकारांना मिळणार सवलतीच्या दरात उपचार
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) शहरांमध्ये व प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकारांना आरोग्य सुविधा व सेवा कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा अध्यक्ष साप्ताहिक विंगचे अब्दुल कय्युम यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत गाडे यांच्याकडे मागणी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत गाडे यांनी सांगितले की आम्ही प्रत्येक खासगी दवाखान्याला पत्रकारांना उपचारासाठी पन्नास टक्के सवलत उपलब्ध करून देण्याचे सूचना देणार आहे. असे यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे शिष्टमंडळाला सांगितले आहे.
औरंगाबाद व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात डॉक्टर यांनी आपली ओपीडी फीस व इतर दवाखान्यातील खर्च प्रचंड वाढ केलेली आहे सदरील वाढ अति प्रमाणात असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना या जीव घेण्या महागाईला व डॉक्टर यांनी दवाखान्याचा खर्च व ओपीडी तपासणी फीस प्रचंड वाढ केल्यामुळे पत्रकारांना परवडत नाही कारण पत्रकारांची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत आहे उत्पन्नाचे स्त्रोत केवळ पत्रकारिता असल्यामुळे सदरील महागडे उपचार व महागडी तपासणी फीस भरण्यास ते असमर्थ आहेत. त्यामुळे आपण आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा माध्यमातून सदरील प्रश्नासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा याकरता आम्ही हा प्रयत्न केला आहे. शहरांमध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये 400 ते 800 विविध तपासणी फी आहे. तसेच रक्त तपासणी व इतर आरोग्य तपासणी यांची फी सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. यासोबतच डॉक्टरांनी त्यांची ओपीडी फीस तपासणी करता प्रचंड वाढ केलेली आहे तरी आपण याबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून सदरील फीस कमीत कमी करावी व सर्व पत्रकारांना दिलासा द्यावा अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा अध्यक्ष साप्ताहिक विंगचे अब्दुल कय्युम यांनी केली आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा अध्यक्ष साप्ताहिक विंग अब्दुल कय्युम, मराठवाडा उपाध्यक्ष सय्यद करीम, जिल्हाध्यक्ष डॉक्टर शकील शेख, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष दिशा सुरवसे पाटील, सदस्य आकाश पाटील आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?