गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द...!
ताजी बातमी... अमित शहा यांचा दौरा दुसऱ्यांदा रद्द
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याची अधिकृत माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील अमित शहा हे 15 लोकसभा जागेचा आढावा घेण्यासाठी येत होते. औरंगाबाद शहरात सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती.
अमित शहा हे अकोला, जळगाव, औरंगाबाद व अमरावती, बुलढाणा, वर्धा राज्यातील काही लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते परंतु नियोजित दौरा रद्द झाला आहे. दुस-यांदा औरंगाबाद शहराचा त्यांचा दौरा रद्द झाला आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अगोदर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्या सभा गाजलेल्या आहे. आता अमित शहा यांची पहील्यांदाच सभा होणार होती. दौरा रद्द झाल्याने सभा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती डि-24 न्यूजला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.
What's Your Reaction?