अबकी बार इम्तियाज जलील, वंचित सोबत चर्चा झाली नाही - असदोद्दीन ओवेसी

 0
अबकी बार इम्तियाज जलील, वंचित सोबत चर्चा झाली नाही - असदोद्दीन ओवेसी

अबकी बार इम्तियाज जलील, वंचितसोबत चर्चा झाली नाही - असदोद्दीन ओवेसी

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) भाजपाचा 400 पारचा नारा आहे एमआयएमचा अबकी बार इम्तियाज जलील असा नारा एमआयएमचे सुप्रीमो असदोद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले इम्तियाज जलील यांना औरंगाबाद मतदार संघातून पुन्हा सर्व जाती धर्मातील जनतेचा आशिर्वाद मिळणार आहे. जलिल यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत दोन वर्षे कोरोनात गेले. तीन वर्षे त्यांनी संसदेत चांगले प्रदर्शन करत जनतेचे प्रश्न उपस्थित करुन न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांनी जातीयवाद न करता सर्व जनतेला सोबत घेत राजकारण केले. ते लोकप्रिय खासदार ठरले आहे. लोकसभा निवडणुकीत जे पक्ष आपले उमेदवार उभे करणार ते दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. भांडणे लावून राजकारण करत आहे म्हणून सर्व जाती धर्मातील लोक इम्तियाज जलिल यांना पसंती देणार आहे तर 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मतदान करुन मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला आहे.

रशिदपूरा येथील पाकीजा फंक्शन हाॅल येथे एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यांनी पुढे सांगितले वंचित सोबत युतीसाठी चर्चा सुरू आहे का या प्रश्नावर त्यांनी सांगितले बाळासाहेब आंबेडकर यांचे आम्ही आदर करतो पण सध्या त्यांच्यासोबत आतापर्यंत काही चर्चा झाली नाही असे स्पष्ट केले. 

राजकीय पक्षांना इलेक्ट्रोल बाॅण्डच्या माध्यमातून कोट्यावधी पैसा मिळालेला आहे. मी हैदराबादचा खासदार असताना तेथील जास्त लोकांनी इलेक्ट्रोल बाॅण्ड खरेदी केले तो पैसा भाजपा, काँग्रेस, बिआरएस, तृणमूल काँग्रेस, बीजू जनता दल, जनता दल युनायटेड व विविध पक्षांना मिळाला. आमच्या पक्षाला तो पैसा मिळाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

एमआयएमने तीन उमेदवार जाहीर केले. प्रचाराला सुरुवात केली आहे. मी स्वतः हैदराबाद, इम्तियाज जलील, महाराष्ट्र, औरंगाबाद, बिहार, किशनगंज, अख्तरुल इमान हे तीन उमेदवार जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील आणखी किती मतदार संघातून उमेदवार देणार याबाबत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ठरवतील. सिएए बाबत त्यांनी भाजपा वर टिका केली. सिएए आला तर एनआरसी येईल म्हणून जनतेने आपले व आपल्या पूर्वजांचे नागरीकत्व सिध्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. वन नेशन वन इलेक्शनचा विरोध करत त्यांनी सांगितले लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मुद्दे वेगवेगळे असतात. प्रत्येक सहा महीन्यात निवडणूक व्हायला पाहिजे यामध्ये गरीबांचा फायदा होईल. आता गॅस आणि इंधनाचे दर कमी केले असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. इंडिया आघाडीचे सरकार येईल का असा प्रश्न विचारला असता ओवेसी म्हणाले सध्या आम्ही आमच्या निवडणुकीत जागा विजयी करण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहे.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी आदी उपस्थि

त होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow