महापालिका निवडणुकीत आरोग्य विभागाची तत्परता व सेवा...
“सार्वत्रिक निवडणुकीत महानगरपालिका आरोग्य विभागाची तत्पर व नियोजनबद्ध सेवा — नागरिकांचे आरोग्य सुरक्षित”
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार, शहरातील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच उपस्थित नागरिकांना उत्तम, तत्पर व नियोजनबद्ध आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधितांच्या आरोग्य सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत एकूण 1372 लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्य सेवा देण्यात आली. मतदान केंद्रे व संबंधित ठिकाणी तैनात वैद्यकीय पथकांमार्फत प्राथमिक उपचार, आपत्कालीन सेवा तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या.
तसेच, तीन रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, एका रुग्णास जिल्हा रुग्णालयात तसेच एका रुग्णास एम.जी.एम. रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले होते. संबंधित सर्व रुग्णांवर वेळेत आवश्यक उपचार करण्यात येऊन त्यांची प्रकृती पूर्णतः स्थिर असून, उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे.
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सक्षम व्यवस्थापनामुळे निवडणूक काळात आरोग्य सेवांचा भक्कम कवच निर्माण झाले.
What's Your Reaction?