महानगरपालिका निवडणूकीची चार ठिकाणी मतमोजणी...

 0
महानगरपालिका निवडणूकीची चार ठिकाणी मतमोजणी...

महापालिका निवडणूक मतमोजणी चार ठिकाणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले. शहरात यावेळी मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. शहरातील चार ठिकाणी हि मतमोजणी होणार आहे. प्रभाग क्रमांक 1, 2,7,8,9,10,11,23,24,25 गरवारे हायटेक फिल्म, एमआयडिसी, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 26,28,29,15,16,17 शासकीय तंत्रनिकेतन उस्मानपुरा, प्रभाग क्रमांक 21,22,27,18,19,20 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, स्टेशन रोड, प्रभाग क्रमांक 3,4,5,6,12,13,14 सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे होईल असे महापालिका प्रशासनाने कळवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow