शहराच्या तापमानात झपाट्याने घसरण, रस्ते सामसूम, नागरीक घरात...
छत्रपती संभाजीनगरात तापमानात झपाट्याने घसरण; रस्ते सामसूम, नागरिक घरातच
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9 (डि-24 न्यूज)- शहरात उशिरा रात्री अचानक तापमानात मोठी घसरण होऊन पारा 27 ते 16 अंश सेल्सिअसवर आला. थंडीचा कडाका जाणवत असल्याने उशिरापर्यंत रस्त्यावर वर्दळ अत्यंत कमी दिसली. नागरिकांनी बाहेर फिरणे टाळत घरातच राहणे पसंत केले.
हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे, आत्तापासूनच गुलाबी थंडीने जोर पकडला असून नोव्हेंबर महिन्यात इतके कमी तापमान जाणवणे असामान्य मानले जाते. पुढील दोन महिने — डिसेंबर व जानेवारी — हे अधिक कडाक्याचे राहण्याची शक्यता असल्याने थंडी आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात रात्री सोबत गार वारे वाहत असल्याने नागरिकांनी जाड कपडे, स्वेटर व शालांचा वापर सुरू केला आहे. दुकाने व बाजारपेठा देखील नेहमीपेक्षा लवकर बंद होत असून चहा-कॉफीचा सेवन वाढला आहे.
दरम्यान, हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून डॉक्टरांनी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?