मार्टी कृती समितीच्या प्रयत्नांना यश, अंमलबजावणी करुन ठोस पावले उचलण्याचे अल्पसंख्याक मंत्र्यांचे आदेश...!

मार्टी कृती समितीच्या प्रयत्नांना यश, अंमलबजावणी करुन ठोस पावले उचलण्याचे अल्पसंख्याक मंत्र्यांचे आदेश
मुंबई, दि.12(डि-24 न्यूज) अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मार्टी कृती समीतीची बैठक संबंधित प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी महत्त्वांच्या विषयावर चर्चा करण्यात आली. मार्टी संस्थेच्या पदभरती, नवीन लेखा शीर्ष उघडणे, कंपनी कायद्यानुसार धोरण बनवणे आणि मुख्यालयासाठी लवकर अंमलबजावणी करण्यावर भर दिला. बैठकीत उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीत अल्पसंख्याक विकास विभागाचे अधिकारी, उपसचिव शेनाय, कक्ष अधिकारी अंधारे, वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद खान तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्टि कृती समीती महाराष्ट्रच्या वतीने मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष एड अजहर पठाण, सरचिटणीस वसिम कुरेशी, सचिव शहेबाज पठाण, सर आसिफ, सहसचिव नबील उज्जमा, सल्लागार सदस्य शहेबाज मनियार बैठकीत उपस्थित होते. बैठकीत मार्टी संस्थेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि सुधारणा होऊन अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी अधिक प्रभावी पाऊल उचलले जाईल असा कृती कार्यक्रम बनवण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी दिले आहेत.
What's Your Reaction?






