बारावी व दहावी बोर्ड परीक्षेत एकता कल्चरल एण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थी चमकले...!
बारावी व दहावी बोर्ड परीक्षेत एकता कल्चरल एण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा डंका...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- आज दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या बोर्डाच्या परीक्षेत एकता कल्चरल एण्ड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व शिक्षकांच्या अनमोल मार्गदर्शनाने विद्यार्थी चमकले याबद्दल संस्थापक अध्यक्ष अब्दुल मुकीम देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
तालुका भोकरदन, अनवा येथील अब्दुल शकूर देशमुख उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल 93 टक्के, तालूका पाचोरा, लासगांव येथील हाजी बशीर देशमुख मेमोरियल उर्दू हायस्कूलचा 88 टक्के, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मिसारवाडी येथील राशिदा बेगम देशमुख उर्दू हायस्कूलचा 87 टक्के, मिलेनियम इंग्लिश हायस्कूलचा 77 टक्के, तालूका एरंडोल, उतरान येथील हाजी लालमिया उर्दू हायस्कूलचा 76 टक्के, एकता ज्युनिअर काॅलेज आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाचा निकाल 99.09 टक्के लागला आहे. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा नसीम आरा देशमुख, उपाध्यक्ष जिशान देशमुख, सचिव अमान देशमुख, डॉ.आमरीन देशमुख, डॉ.हाफिज देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?