सैन्याचे पोषाख परिधान करून फेरीवाल्यांना त्रास देने बंद करा, पोलिस आयुक्तांकडे आमदार संजय केनेकर यांची तक्रार....

 0
सैन्याचे पोषाख परिधान करून फेरीवाल्यांना त्रास देने बंद करा, पोलिस आयुक्तांकडे आमदार संजय केनेकर यांची तक्रार....

फेरीवाले आणि हिंदू सणांवरील अन्यायाविरोधात आमदार संजय केनेकर यांची ठाम भूमिका...

पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून कडक कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) -गेल्या काही दिवसांपासून शहरात महानगरपालिका फेरीवाला अतिक्रमण पथकातील काही निवृत्त सैन्यदलातील कर्मचारी सैन्यदलाचा गणवेश परिधान करून पथविक्रेते आणि फेरीवाल्यांवर अन्याय करत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. हे कर्मचारी जाणीवपूर्वक हिंदू सणांच्या काळात फेरीवाल्यांना त्रास देणे, दमदाटी करणे, माल जप्त करणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारांमध्ये सामील असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात आमदार संजय केनेकर यांनी पूर्वीच महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

आमदार केनेकर यांनी सांगितले की, या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून केवळ पथविक्रेत्यांना त्रासच दिला जात नाही, तर हिंदू देवदेवतांची विटंबना, पूजेच्या साहित्याचा अपमान आणि हिंदू संस्कृतीचा अवमान अशा गंभीर घटनाही घडत आहेत. अशा घटनांमुळे सामाजिक तणाव वाढत असून धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका आहे.

तसेच निवृत्तीनंतर सैन्यदलाचा गणवेश परिधान करून धमकावणे हा भारतीय कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून, खाजगी सुरक्षा संस्था नियमन अधिनियम 2005 व 2006 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार अशा कृत्यांना शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे अशा व्यक्तींविरुद्ध तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे केनेकर यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान पोलीस आयुक्तांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले असून, त्यांनी स्वतः लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार संजय केनेकर यांनी स्पष्ट केले की,

“सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून हिंदू समाज, संस्कृती आणि श्रद्धेवर होणारा कोणताही अन्याय मी सहन करणार नाही. गरीब, श्रमिक आणि पथविक्रेत्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि समाजात अराजकता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन.”

आमदार संजय केनेकर यांनी केलेली मागणी...

 सैन्य गणवेश परिधान करून पथविक्रेत्यांना धमकावणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी. हिंदू सणांच्या काळात जाणीवपूर्वक माल जप्त करणे, धमकावणे आणि देवदेवतांचा अपमान केल्याचे प्रकार.

समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका लक्षात घेता पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल.

भारतीय न्याय संहितेनुसार अशा कृत्यांना शिक्षेची तरतूद असल्याची माहिती.

पोलीस आयुक्तांकडून तातडीने कारवाईचे आश्वासन.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow