उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चाचे आयोजन...

मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा निमित्त गाढेजळगांवात ग्रामसभा
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)-: शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोंबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडाव्यापी विराट हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या हंबरडा मोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या निमित्त शिवसेना नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवार 5 ऑक्टोंबर रोजी संभाजीनगर तालुक्यातील गाढेजळगांव येथे ग्रामसभा घेतली.
या बैठकीत मोर्चाचे आयोजन, शेतकऱ्यांचा सहभाग, तसेच राज्य सरकारला द्यायच्या मागण्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मोर्चाद्वारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. हंबरडा मोर्चा हा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधातील तीव्र निषेधाचा आवाज ठरेल, असे दानवे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी शिवसेना “हंबरडा मोर्चा” विराट प्रमाणात काढणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई तसेच कर्जमाफीबाबत सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे दानवे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी शिवसेना मागे हटणार नाही. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, शंकर ठोंबरे, श्रीमंत उकिर्डे, मदन चौधरी, एकनाथ चौधरी, बबनराव चौधरी, बाळू भोसले, बबनराव वाघ, दत्ता उकिर्डे, भास्कर तारो व सय्यद पठाण उपस्थित होते.
What's Your Reaction?






